यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे, नेते, मनसे
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !
पनवेल – मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायगड येथे २७ ऑगस्ट या दिवशी ‘जागर यात्रा’ काढण्यात आली आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले होते. ‘आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत; मात्र यापुढील जागर यात्रा शांततेत असणार नाही’, अशी चेतावणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी येथे दिली, तसेच ‘आमच्यावर कोणते खटले प्रविष्ट करायचे, ते करा. जागे व्हा’, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते माणगाव अशी १६ किलोमीटरची पदयात्रा मनसेच्या वतीने काढण्यात आली आहे. ८ टप्प्यात मनसेच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात आली.