मुंबईत नैराश्य आणि आजार यांना कंटाळून पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !
मुंबई – कांदिवली (पूर्व) परिसरात ७९ वर्षीय विष्णुकांत बलूर यांनी नैराश्य आणि आजार यांना कंटाळून ७६ वर्षीय पत्नी शकुंतला बलूर यांच्यावर चाकूने आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पत्नीवर चाकूने प्रथम डोक्यावर आक्रमण करून तिचा गळा कापण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही आक्रमण केले; मात्र पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात भरती केले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
संपादकीय भूमिकानैराश्याचा सामना करण्यासाठी आणि वृद्धापकाळी आनंदाने रहाता येण्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे ! |