रमण महर्षींनी झाडावरच्या अंजिरांकडे दृष्टी टाकल्यावर माकडांच्या टोळीने फांद्या हालवून पिकलेले सर्व अंजीर खाली पाडणेे

रमण महर्षी

एकदा श्री रमण महर्षी त्यांच्या भक्तांसमवेत डोंगराच्या पायथ्याशी फिरत होते. चालता चालता ते सर्व दूर निघून गेले, दुपारी तहान-भूक सतवू लागली. विचार केला की, ‘भूक लागली आहे, काय करावे ? काहीतरी खायला मिळावे.’ अंजिराचे झाड दिसले; पण त्यांच्यापैकी कुणालाही झाडावर चढता येत नव्हते. आता काय करावे ? महर्षी अंजिरांकडे एकटक पहात राहिले. एवढ्यात माकडांची एक टोळी त्या झाडावर आली आणि ‘हूप… हूप… हूप…’ करून फांद्या हालवून सर्व पिकलेले अंजीर खाली पाडले. मग ती टोळी निघून गेली. आश्‍चर्य !… एकही अंजीर उचलून माकडांनी खाल्ले नाही. भक्तांनी आणि महाराजांनी पोटभर अंजीर खाल्ले. माकडांचा प्रेरक कोण आहे ? तर ईश्‍वर !

(संदर्भ : लोक कल्याण सेतू, मार्च २०२१)