रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर कर्नाटक राज्यातील मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. बागलकोट येथील मान्यवरांचे अभिप्राय
१ अ. श्री. राजू टंकसाली
१. ‘रामनाथी आश्रम हे ‘चांगले संस्कार मिळतील’, असे स्थान आहे.
२. सेवाभावाने कार्य करणारे साधक खरोखर प्रशंसनीय आहेत.’
१ आ. श्री. गुरुपाद कुलली
१. ‘आश्रम पाहिल्याने माझी भाववृद्धी झाली.
२. येथील साधक त्यांचे काम चोखपणे करत असलेले पाहून आनंद झाला.
३. ‘आम्ही आमच्या गावी आध्यात्मिक कार्य करावे’, असे मला वाटले.’
१ इ. श्री. लक्ष्मण बिसरेड्डी
१. ‘आश्रमात असलेल्या साधकांची भूमिका पुष्कळ मोठी आहे. त्यांची सेवा कौतुकास्पद आहे.’
२. बेंगळुरू येथील मान्यवरांचे अभिप्राय
२ अ. श्री. पुनीत केरेहल्ली, बेंगळुरू, कर्नाटक.
१. ‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.
२. हा आश्रम पाहिल्याने माझ्या पुढच्या जीवनात पालट होणार आहे.’
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. बागलकोट येथील मान्यवरांचे अभिप्राय
१ अ. श्री. चेन्नू आरेगार
१. ‘आतापर्यंत देव आणि भूत यांंवर माझा विश्वास नव्हता; पण हे प्रदर्शन पाहून ‘हे खरेच आहे’, असे मला वाटले.’
१ आ. श्री. राजू टंकसाली
१. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘भारत हे प्राचीन संस्कृती आणि विज्ञान यांचा समन्वय असलेले राष्ट्र आहेे’, असे जाणवले.’
२. बेंगळुरू येथील मान्यवरांचे अभिप्राय
२ अ. श्री. पुनीत केरेहल्ली, बेंगळुरू, कर्नाटक.
१. ‘हे प्रदर्शन पाहून साधनेची आवश्यकता माझ्या लक्षात आली.’
आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. बागलकोट (कर्नाटक) येथील अभिप्राय
१ अ. श्री. शिवू पी. हुनश्याल
१. ‘ही पी.पी.टी. पाहून विदेशी संगीत आपल्यासाठी हानीकारक आहे आणि देशी संगीताने आनंद होतो’, हे मला समजले.’
१ आ. श्री. अर्जुन पवार
१. ‘भारतीय संगीतात असलेली सकारात्मक शक्ती मला जाणवली.’
१ इ. श्री. राजू टंकसाली
१. ‘संगीत म्हणजे भारताला मिळालेली एक देणगी आहे. संगीताच्या ज्ञानाने एक प्रकारची एकाग्रता वाढते.’
१ ई. श्री. गुरुपाद कुलली
१. ‘संगीत ऐकून देवाची आराधना करण्याची शक्ती वाढून मनाला समाधान आणि उल्हास वाटतो.’
२. धारवाड येथील मान्यवरांचा अभिप्राय
२ अ. श्री. हनमंतप्पा (अपान्ना) हिरगन्नवर, धारवाड
१. ‘संगीताविषयी अनुभवल्यावर सर्व इंद्रिये चैतन्यमय होऊन मला आनंद झाला. देवाच्या कृपेने मला माझ्या स्वभावदोषांच्या परिवर्तनाचा मार्ग मिळाला.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.६.२०२३)
|