पुणे येथे छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन धर्मांध मित्राकडून तरुणीवर बलात्कार !
पुणे – लहानपणापासून मित्र असलेल्या आसिफ शेख याने मैत्रीचा अपलाभ घेत दोघांचे एकत्र असलेले छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडला असून पीडितेच्या तक्रारीवरून बीड जिल्ह्यातील आसिफ शेखवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते १३ डिसेंबर २०२२ या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये आणि आरोपीच्या चंदननगर येथील भावाच्या घरी घडला आहे.
शेख याने छायाचित्र प्रसारित करून अपकीर्ती करण्याच्या धमकीसह तरुणीच्या मामाला ठार मारण्याची धमकी देऊन तरुणीसह बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.
संपादकीय भूमिकाबलात्कार्यांना शिक्षेची भीती वाटत नाही, हेच स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून लक्षात येते. त्यासाठी गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा होणे आवश्यक ! |