अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात वीजपुरवठा खंडित !
|
अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महिला रुग्ण आणि नवजात बालके यांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या प्रकारामुळे रुग्णही संतप्त झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मलेरिया, टायफॉईड असे आजारही पसरत आहेत. अशा स्थितीत वीज नसणे, डासांचे वाढते प्रमाण, याचा परिणाम नवजात अर्भकांवर होऊन त्यांचा जीव धोक्यात येणे ही किती मोठी गैरसोय आहे ? हा गुन्हा आहे. या सर्वांविरोधात मी कारवाई करायला लावीन.’’ विजेअभावी रुग्णालयात पुष्कळ उकडत होते. खिडक्या उघडल्यावर डास आत येत होते. त्यामुळे महिला रुग्ण त्रस्त झाल्या होत्या.