मीरारोड येथे पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या !
मुंबई – पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथील आनंद सरिता या इमारतीमध्ये रहाणार्या राजकुमारी गुप्ता (वय ५५ वर्षे) या महिलेने पती रमेश गुप्ता (वय ६९ वर्षे) यांची दगडाने ठेचून हत्या केली. २४ ऑगस्ट या दिवशी स्वत:च्या सदनिकेमध्ये राजकुमारी हिने ही निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी राजकुमारी हिला अटक केली आहे.
मीरा रोड पुन्हा हादरले! नैराश्यग्रस्त पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या; मुलगा म्हणाला, “घरी आलो तेव्हा आई…”https://t.co/dxtHvyW3ni
— LoksattaLive (@LoksattaLive) August 26, 2023
सायंकाळी सदनिकेमधून आलेल्या आवाजामुळे सुरक्षारक्षक आणि शेजारी तेथे धावत आले. त्या वेळी रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आणि बाजूला राजकुमारी उभी असल्याचे त्यांना दिसले. हा प्रकार पाहून शेजार्यांनी त्वरित कामावर गेलेल्या गुप्ता दांपत्याच्या मुलाला बोलावून घेतले. राजकुमारी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. राजकुमारी यांनी पतीसमवेत झालेल्या वादातून हत्या केल्याची स्वीकृती पोलिसांकडे दिली आहे.