चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्वविद्यालयात काश्मिरी मुसलमानांकडून हिंसाचार !
अल्लाहू अकबरच्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा !
चितोडगड (राजस्थान) – येथील मेवाड विश्वविद्यालय परिसरात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. या विद्यार्थ्यांना दुसर्या गटाने विरोध केला. या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले. यात २ जण गंभीररित्या घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३६ विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. ही घटना २५ ऑगस्टच्या रात्री घडली. हिंसाचाराचा आणि मुसलमान विद्यार्थी घोषणाबाजी करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
A violent clash broke out at #MewarUniversity in #Chittorgarh between two groups during dinner, leaving over 10 injured.https://t.co/pVpyqrmakZ
— IndiaToday (@IndiaToday) August 26, 2023
मिळालेल्या माहितीनुसार विश्वविद्यालयाच्या परिसरातील भोजनालयामध्ये जेवणावरून झालेल्या वादातून काश्मिरी मुसलमान आणि अन्य विद्यार्थी यांच्यात हाणामारी झाली. मुसलमान विद्यार्थ्यांनी भोजनालयात तोडफोड केली, तसेच शस्त्रांद्वारे आक्रमण केलेे. यानंतर त्यांनी स्थनिक नागरिकांनाही मारहाण केली. यात एक जण गंभीररित्या घायाळ झाला. त्याला उदयपूर येथील रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. हिंसाचाराची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कायकर्ते विश्वविद्यालयाबाहेर गोळा झाले होते. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|