कोलकाता येथे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्याला अटक
कोलकाता (बंगाल) – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या भक्तबंशी झा याला कोलकाता पोलिसांनी अटक केली. झा याला पाकमधून ‘हनीट्रॅप’मध्ये (महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे) अडकवण्यात आले होते. त्यानंतर त्याला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाठवण्यास सांगण्यात आले होते. भक्तबंशी हा पाकिस्तानातील ‘आरुषी शर्मा’ नावाच्या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तिला देहलीतील अनेक सैनिकी तळांची छायाचित्रे पाठवली होती.
सौजन्य न्यूज एक्स
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा झाल्यास इतरांवर जरब बसेल ! |