दोनापावला येथील आधुनिक वैद्याच्या बंगल्यात चोरी करणारा चोरटा जेरबंद
‘वेब हनी ट्रॅप’च्या साहाय्याने चोरटा जेरबंद
(‘हनी ट्रॅप’ म्हणजे महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे)
पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – दोनापावला येथील आधुनिक वैद्य संजय खोपे यांच्या बंगल्यातून ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी सुरेदर छेत्री (वय ३१ वर्षे, रहाणारा नेपाळ) याला ‘वेब हनी ट्रॅप’च्या साहाय्याने बंगालमधून कह्यात घेतले आहे.
पणजी पोलिसांनी केली कारवाई https://t.co/6dXpcbUXWE#goa #goanews #goaupdate #donapaula #westbengal #goapolice
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) August 25, 2023
दोनापावला येथे ३१ जुलैला आधुनिक वैद्य संजय खोपे यांच्या बंगल्यात चोरी करण्यात आली होती. पोलिसांना ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून सुरेदर छेत्री याच्या संशयित हालचाली लक्षात आल्या. संशयित छेत्री याने गोव्यात सर्वांना दिलेले भ्रमणभाष क्रमांक हे बनावट होते. पोलिसांना संशयिताचा ‘इंस्टाग्राम’ आणि ‘फेसबुक’ खाते मिळवण्यात यश आले. पोलिसांनी एका युवतीला सामाजिक माध्यमाद्वारे संशयिताशी मैत्री करण्यास सांगितले. युवतीने सामाजिक माध्यमाद्वारे संशयिताचा विश्वास संपादन केला आणि त्याच्याकडून पत्ता घेतला. त्यानंतर पोलिसांनी संशयित छेत्री त्याला बंगालमधून कह्यात घेतले.