पुणे येथील चामुंडामातेच्या मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी !
पुणे – येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील भिलारेवाडी या ठिकाणी असलेल्या चामुंडा भवानीमाता मंदिरात अज्ञात चोरांनी चोरी केली आहे. चोरांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील देवीच्या अंगावरील १ लाख १२ सहस्र रुपयांचे दागिने चोरून नेले. पुजारी रोशन दहाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :राज्यात काय किंवा देशात काय, कुठे ना कुठेतरी मंदिरात चोरी झाल्याची घटना नित्याचीच झाली आहे. मंदिरातील चोर्या थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत हीच भाविकांची अपेक्षा ! |