हत्येच्या उद्देशाने गायींना बांधून ठेवल्याच्या प्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
गेवराई (जिल्हा बीड) – येथील निकम गल्लीमध्ये २ गायींची हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांना बांधून ठेवल्याच्या प्रकरणी अब्दुल गुलाम अन्सारी आणि सगीर सत्तार कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी ३ लाख ७१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या पथकाला संबंधित आरोपींनी घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये २ गायींना उपाशी अवस्थेत अस्वच्छ जागी बांधल्याचे आढळले, तसेच या ठिकाणी गोवंशियांची २ क्विंटल हाडे सापडली आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.
संपादकीय भूमिका :गोवंशहत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्यक ! |