सोलापूर येथील ‘अॅडव्हेंचर पार्क’ परिसरात कचर्याची दुर्गंधी !
सोलापूर, २५ ऑगस्ट (वार्ता.) – येथे श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ सोलापूर महापालिकेच्या वतीने ‘अॅडव्हेंचर पार्क’ सिद्ध करण्यात आले आहे. या पार्कच्या बाहेर नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून हा कचरा महापालिकेकडून वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे भाविकांना या कचर्याच्या दुर्गंधीतूनच श्री सिद्धेश्वर मंदिरात जावे लागत आहे. या ठिकाणी महापालिकेने कचरापेटी ठेवलेली असूनही त्यामध्ये कचरा न टाकता रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर येथील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. ‘याठिकाणी अशा प्रकारे अस्वच्छता आणि दुर्गंधी असणे शहराच्या दृष्टीने अशोभनीय असून हा कचरा साठू नये, यासाठी महापालिकेकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी’, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासन जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतःच कृती का करत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका :कचराही वेळेत न उचलणारे प्रशासन काय कामाचे ? |