‘निर्विचार’ हा नामजप केल्यानंतर होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट
१. अनुभूती
अ. ‘मी ‘निर्विचार’ हा नामजप करत असतांना माझे ध्यान लागले आणि माझे मन निर्विचार झाले.
आ. नामजप करतांना ‘माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित होऊन माझ्या श्वासाची गती अल्प झाली’, असे मला जाणवले.
इ. ‘माझ्या सहस्रारामधून चैतन्याचा प्रवाह माझ्या अनाहतचक्रापर्यंत जात आहे’, असे मला जाणवले आणि माझे मन शांत झाले. ‘या चैतन्याच्या प्रवाहाकडे लक्ष केंद्रित करून शांतपणे त्या चैतन्याचा आस्वाद घ्यावा’, असे मला वाटत होते.
२. स्वतःमध्ये जाणवलेले पालट
अ. पूर्वी माझ्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की, तिचा माझ्या मनावर परिणाम होऊन मी त्याच विचारांत रहात असे. आता मी ‘निर्विचार’ हा नामजप करत असल्यामुळे त्या घटनेचा परिणाम माझ्या मनावर होत नाही. मी साक्षीभावाने पाहू शकतो.
आ. माझ्या मनात येणार्या अयोग्य प्रतिक्रियांचे प्रमाणही उणावले आहे.
या अनुभूती दिल्याबद्दल मी ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |