ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी शेतकर्‍यांनी फेकला रस्‍त्‍यावर कचरा !

असे पाऊल शेतकर्‍यांना उचलावे लागणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

सातारा, २५ ऑगस्‍ट (वार्ता.) – देगाव रस्‍ता औद्योगिक वसाहतीकडे जातांना रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला शेती असून परिसरातील हॉटेल व्‍यावसायिक, चिकन दुकानदार, उपनगरातून येणारे-जाणारे नागरिक शेतात कचरा टाकत होते. हा कचरा शेतात आल्‍यामुळे शेतकर्‍यांना त्‍याचा त्रास होऊ लागला. शेतकर्‍यांनी अनेकवेळा ही गोष्‍ट कोडोली प्रशासनाला सांगूनही प्रशासनाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. यासाठी शेतकर्‍यांनी वैतागून कोडोली प्रशासनाला जाग यावी, यासाठी शेतालगतचा कचरा गोळा करून तो देगाव रस्‍त्‍यावर फेकला. (शेतकर्‍यांच्‍या समस्‍यांकडे दुर्लक्ष करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! – संपादक)