छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा, राजपूत आणि भटके-विमुक्त समाज कृती समितीची महामोर्चाद्वारे मागणी !
जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून सवलत घेणार्यांची चौकशी करा !
छत्रपती संभाजीनगर – जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून सवलती घेणार्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील बंजारा, राजपूत भामटा, भटके-विमुक्त समाज कृती समितीच्या वतीने येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चासाठी सहस्रोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधात घोषणा देऊन या प्रकरणी राज्य सरकारने विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आयटी) स्थापन करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली.
बनावट प्रमाणपत्र रहित करा !
बनावट प्रमाणपत्र रहित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. सरकार आमच्या विरोधात काम करत आहे, असा आरोप बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांनी केला.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जातीचे खोटे प्रमाणपत्र कसे काढले जात आहे, याकडे त्वरित आणि गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे ! |