मुंबई विमानतळावरील विमानात बाँब ठेवल्याचा दूरभाष !
सातारा येथील १० वर्षीय अपंग मुलाने चुकून दूरभाष केल्याचे उघड
नवी मुंबई – मुंबई विमानतळावरील एका विमानात बाँब ठेवल्याचा दूरभाष नवी मुंबईतील ‘११२’ क्रमांकावर आला होता. यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. अन्वेषणानंतर सातारा येथे रहाणार्या १० वर्षांच्या अपंग मुलाने चुकून दूरभाष केल्याचे उघड झाले.
मुंबई : विमानतळावरील विमानत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी#mumbaihttps://t.co/njdzGjDd01
— LoksattaLive (@LoksattaLive) August 25, 2023
बाँब ठेवलेले विमान १० घंट्यांनी तेथून निघणार असून साहाय्याची आवश्यकता असल्याचे दूरभाष करणार्या व्यक्तीने सांगितले. या माहितीनंतर तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. आतकंवादविरोधी यंत्रणा, पोलीस, बाँबशोधक आणि नाशक पथक आदींना सतर्क करण्यात आले. संपूर्ण विमानतळाची पडताळणी करण्यात आली. तातडीने वरिष्ठ अधिकार्यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता वरील प्रकार समोर आला.