हिंदु महिलेला केरळला घेऊन जाण्याचा ख्रिस्त्याचा डाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी उधळला !
|
रत्नागिरी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘२३ ऑगस्ट या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे. ही गाडी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी चिपळूण येथून सुटली आहे. या महिलेला केरळला नेण्यासाठी एक ख्रिस्ती व्यक्ती तिच्या मागे लागली आहे’, असे त्या महिलेच्या डब्यात असलेल्या सहप्रवाशांनी संपर्क करून येथील श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना कळवले. त्यानंतर धारकर्यांनी येथील रेल्वेस्थानकावर एकत्र येत हा विषय रेल्वे पोलिसांना सांगितला. रेल्वेगाडी रत्नागिरी स्थानकावर येताच त्या महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले आणि तिला केरळ येथे घेऊन जाणारा फिलिप्स फ्रन्सिस मस्करेहस या ख्रिस्त्यालाही कह्यात घेतले. त्यामुळे हिंदु महिलेला केरळला घेऊन जाण्याचा ख्रिस्त्याचा डाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांच्या जागरूकतेमुळे उधळला गेला.
इंदूर-कोच्चुवेल्ली या गाडीमध्ये इंदूर येथून आलेल्या महिलेकडे तिकीट नसल्याचे तिकीट तपासनीसाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना कळवली. त्या महिलेचे सहप्रवासी असलेल्या रत्नागिरी येथील पावसकर दांपत्याने तिची चौकशी केली असता ती रागाने घरातून बाहेर पडल्याचे समजले. हे संभाषण चालू असतांना केरळ येथे जाणारे फिलिप्स फ्रन्सिस मस्करेहस ही व्यक्ती त्या महिलेसमवेत बोलू लागली. नंतर त्या महिलेचा हात पकडून ‘तू माझ्या समवेत माझ्या संस्थेमध्ये चल. तुला तिकडे भरती करतो, तुला ‘नर्स’ बनवतो. तू तुझ्या मामा आणि आईकडे गेलीस, तर मी पुन्हा भेटणार नाही’, असे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केले. त्या व्यक्तीने पावसकर दांपत्य आणि अन्य प्रवासी यांनाही धमकी देत ‘पोलिसांना आणि तिच्या नातेवाइकांना संपर्क करू नका. मी तिचेे दायित्व घेतो’, असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांशी संपर्क करणार्या महिला प्रवाशांनाही त्याने दमदाटी केली. हा सर्व प्रकार रत्नागिरीतील पावसकर दांपत्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांशी संपर्क करून सांगितला. हे सर्व घडेपर्यंत चिपळूण स्थानक आले होते. तेथे रेल्वे पोलीस तिकीट नसलेल्या मुलीची चौकशी करण्याकरता डब्यामध्ये चढले असता फिलिप्स फ्रन्सिस मस्करेहस या व्यक्तीने रेल्वे पोलिसांशीही असभ्य वर्तन केले.
धारकर्यांना संपर्क झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी, रत्नागिरी तालुका विभागप्रमुख श्री. गणेश गायकवाड, श्री. सुशील कदम, श्री. उमेश कुलकर्णी, श्री. सुशील आयवळे, श्री. खैर आणि श्री अविनाश पाटील यांनी इंदूर येथील महिलेच्या मामाशी आणि इंदूर पोलिसांशी संपर्क साधला अन् रेल्वे डब्यात घडत असलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर धारकर्यांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकातील रेल्वे पोलीस श्री. मधाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला, तसेच त्या महिलेचे नातेवाईक, इंदूर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्याशी समन्वय साधून त्या महिलेला रत्नागिरी रेल्वेस्थानकात सुखरूप कह्यात घेतले.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला आणि फिलिप्स फ्रन्सिस मस्करेहस यांना पुढील चौकशी करता रत्नागिरी शहर पोलिसांच्या कह्यात दिले. हा घडलेला प्रकार कळताच अनेक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. रात्री उशिरा फिलिप्स फ्रान्सिस मस्करेहस या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५४, ३५४ एए (४), ३४५ डीडी, ५०५, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिका
|