विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथील मंदिराच्या दानपेटीत मिळाला १०० कोटी रुपयांचा धनादेश; मात्र बँक खात्यात अवघे १७ रुपये !
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – येथील सिम्हाचलम् भागातील श्रीवराह लक्ष्मी नरसिंहा स्वामी वारी मंदिरातील दानपेटीत मंदिराच्या व्यवस्थापनाला एक धनादेश सापडला. हा धनादेश १०० कोटी रुपयांचा होता. हा धनादेश कोटक महिंद्रा या बँकेचा होता. मंदिराच्या व्यवस्थापनाने धनादेश वठवण्यासाठी बँकेशी संपर्क साधल्यावर त्यांना धक्काच बसला; कारण धनादेश दानपेटीत टाकणार्या व्यक्तीच्या बँक खात्यात केवळ १७ रुपये होते. या धनादेशाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाने अद्यापपर्यंत या प्रकरणात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केलेली नाही.
आंध्र प्रदेश के विशाखापत्तनम से हैरान करने वाली मामला सामने आया है #AndhraPradesh (@Journo_Abdul)https://t.co/IB2yN8mTzO
— AajTak (@aajtak) August 24, 2023
संपादकीय भूमिकादेवाची अशी फसवणूक करणारे या देशात आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद ! |