‘आरोग्य आधार’ अॅपद्वारे धर्मादाय रुग्णालयांतील खाटा राखीव करता येणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
मुंबई – आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत् माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ‘अॅप’द्वारे तात्काळ उपलब्ध होईल. या अॅपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांच्या संख्येची माहिती, तसेच तात्काळ खाट राखीव करता येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य संस्थांच्या बृहत् आराखड्याच्या सादरीकरणाच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिली.
‘त्या’ रुग्णालयांची माहिती ॲपवर; धर्मादाय रुग्णालयांना आता बसणार चापhttps://t.co/k5Sgg5PEco
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) August 25, 2023
या वेळी मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याविषयी आदर्श कार्यप्रणाली सिद्ध करतांना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच या अॅपद्वारे ‘वॉर रूम’, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापन यांना यासंदर्भातील माहिती एकाच वेळी मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका रुग्णालय, तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या मागणीचा प्रस्ताव देणे, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रीटमेंट युनिट, तसेच ‘नर्सिंग होम अॅप’मध्ये रुग्णालय आणि डॉक्टर यांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. असे सर्व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|