व्याभिचारी महिलेला कंबरेपर्यंत पुरून तिला दगडाने ठेचून ठार मारा : ब्रिटीश इमाम
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख)
लंडन – महिलेला कंबरेपर्यंत पुरून टाका आणि तिला दगडाने ठेचून ठार मारा, असे चिथावणीखोर वक्तव्य ब्रिटनमधील बर्मिंघम येथील मशिदीचे इमाम शेख जकाउल्लाह सलीम यांनी केले. याविषयी लोकांसमोर भाषण करतांनाचा त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये शेख सलीम यांनी शरीयत कायद्याचा संदर्भ देत विवाहित व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारणे, हीच शिक्षा असल्याचे सांगितले आहे. तसेच इस्लामिक कायाद्यामध्ये अनैतिक संबंध ठेवणार्या अविवाहितांसाठी १०० फटके मारण्याची शिक्षा सांगितल्याचे इमामने म्हटले आहे.
UK: Birmingham’s Green Lane Mosque on how to stone a woman to death.
“You must first bury her up to her waist to preserve her modesty”.
The British government has just given this mosque a £2.2 mn grant for “youth services”. pic.twitter.com/h6KRmfHNHF
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 22, 2023
जेव्हा अल्लाच्या आदेशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण कोणत्याही प्रकारची दया किंवा सहानुभूती दाखवू नये, असे इमामने म्हटले आहे. जुलै २०२३ मध्ये ब्रिटीश सरकारने अन्य धार्मिक समुदायांना द्वेषपूर्ण गुन्हे आणि आतंकवादी आक्रमणे यांपासून परावृत्त करण्याचे दायित्व या मशिदीवर सोपवले असून त्यासाठी २३ कोटी २४ लाख रुपये साहाय्य केले होते; मात्र या पैशांचा गैरवापर करत शेख सलीम महिलांना दगडाने ठेचून मारण्यासाठी चिथावणी देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी मानतावाद्यांना काय म्हणायचे आहे ? |