कळवा येथे अमली पदार्थांची तस्‍करी करणारे धर्मांध अटकेत !

२ लाख ६५ सहस्र रुपयांची एम्.डी. पावडर हस्‍तगत

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २४ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील कळवा नाका परिसरात एम्.डी. पावडरची तस्‍करी करणार्‍या जिशान जाफर सैयद (वय ३० वर्षे) आणि आसीफ अब्‍दुल शेख (वय ३० वर्षे) या दोघांना ठाणे गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्‍या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. (लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍यांक असलेले धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍यांक – संपादक) त्‍यांच्‍याकडून २ लाख ६५ सहस्र रुपयांची एम्.डी. पावडर हस्‍तगत करण्‍यात आली. यांनी ही पावडर कुणाकडून आणली, याचे अन्‍वेषण चालू आहे.