ऑनलाईन खेळ खेळण्यासाठी नोकराची मालकाच्या घरात चोरी !
पुणे – सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘रमी’ खेळण्याच्या ऑनलाईन खेळाच्या आमिषाला बळी पडून येथील औंध भागातील नोकराने मालकाच्या घरातून ३८ लाख रुपयांची चोरी केली. मनीष रॉय असे आरोपीचे नाव असून त्याला कह्यात घेतले आहे. आरोपीने मालक त्र्यंबकराव पाटील यांच्या घरातून ५५ तोळे सोने आणि ११ लाख रुपये अशी एकूण ३८ लाख रुपयांची चोरी केली आहे.
संपादकीय भूमिका :अल्प कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या मागे लागल्याने अशा घटना घडत आहेत. ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून पैसे मिळवणे हा एकप्रकारचा जुगारच आहे. याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन खेळांवर बंदीच हवी ! |