भारताने ही परंपरा जपून ठेवली आहे !
‘गुरुपौर्णिमा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात साजरी केली जात होती; परंतु काळाचे असे कुचक्र फिरले की, अन्य देश या गुरुपौर्णिमेचे ज्ञान आणि गुरुपरंपरेचे अमृत पिणे-पाजणे विसरून गेले; परंतु भारताने अजूनही ही परंपरा जपून ठेवली आहे. प्रत्येक गुरुपौर्णिमेला भारताचे लाखो ‘लाल’ (शिष्य) गुरुपूजन करून आणि मार्गदर्शन मिळवून पुण्यात्मा बनतात.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)