प्रज्ञानंद याचा विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव
बाकू (अझरबैजान) – ‘फिडे बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धे’च्या अंतिम सामन्यात भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद याला नॉर्वेचा ग्रंडमास्टर मॅग्नस कार्लसन याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्याच्या २ फेर्या अनिर्णित राहिल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये खेळ झाला. यात कार्लसनने प्रज्ञानंदचा पराभव केला.
चेस वर्ल्डकप फायनलमध्ये मॅग्नस कार्ल्सन विजयी, भारताच्या प्रज्ञानंद रमेशबाबूचा टायब्रेक्समध्ये पराभव.#praggnanandha pic.twitter.com/VRHJCwzTUc
— BOL BHIDU (@bolbhidu) August 24, 2023
काय आहे टायब्रेकर ?
टायब्रेकरमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येकी २५ मिनिटांच्या २ फेर्या खेळवल्या जातात. यात प्रत्येक चालीसाठी १० सेकंद दिले जातात. यामध्येही निकाल लागला नाही, तर प्रत्येकी १० मिनिटांच्या २ फेर्या खेळवल्या जातात. यातही प्रत्येक चालीसाठी १० सेकंद वेळ दिला जातो. त्यातूनही निकाल लागला नाही, तर प्रत्येकी ५ मिनिटांच्या २ फेर्या खेळवल्या जातात. यात प्रत्येक चालीसाठी ३ सेकंद दिले जातात. त्यातही निकाल लागला नाही, तर ३ मिनिटांची १ फेरी खेळवली जाते. यात प्रत्येक चालीसाठी २ सेकंद दिले जातात. निकाल लागेपर्यंत ३ मिनिटांच्या फेर्या खेळवल्या जातात.