बलात्काराला विरोध करणार्या अल्पवयीन नेपाळी हिंदु मुलीची महंमद अब्बासकडून हत्या !
|
सिलिगुडी (बंगाल) – येथील माटीगारा येथे रवींद्रपल्ली भागात शालेय गणवेशात एका १७ वर्षीय नेपाळी हिंदु मुलीचा मृतदेह आढळला. महंमद अब्बास नावाच्या वासनांधाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध केल्याने अब्बासने तिचा चेहरा विटेने ठेचून तिला ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह कह्यात घेतला. ही मुलगी जवळच्या नेपाळी शाळेत शिकत होती. पोलिसांनी अब्बासला अटक केली असून त्याने त्याच्या गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. पीडितेची आई आणि भाऊ यांनी अब्बासच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Massive protest by students in #Mirik against the murder of a school student coming back home from school, by Mohammad Abbas.
Abbas lives in a place locally known as “Chhota Pakistan” in #Matigara
Are our children safe?
Who allowed illegal immigrants to settle ? @HMOIndia pic.twitter.com/8Zjl5oSfjo
— The Darjeeling Chronicle (@TheDarjChron) August 24, 2023
२२ वर्षीय अब्बास याला २ पत्नी असून याआधीही त्याने एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पीडिता शाळेतून घरी परतत असतांना अब्बासने तिला गाठले आणि बळजोरीने जवळच्या निर्मनुष्य इमारतीत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिने आरडाओरडा करायला आरंभ केल्यावर अब्बासने विटेने तिचा चेहरा ठेचला. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून जवळपासचे लोक घटनास्थळी पोचले. तेथे ती रक्ताच्या थारोळ्यात आढळली, तर अब्बास पळून गेला होता.
या घटनेच्या विरोधात सिलिगुडी नारीशक्ती आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत अब्बासच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली.
West Bengal: Police arrested Mohd Abbas for the brutal murder of a minor Hindu girl; locals protested via @eOrganiser https://t.co/oUJXPMcCdk
— Organiser Weekly (@eOrganiser) August 23, 2023
‘पॉक्सो’ कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या बलात्कार्यांना २-३ दिवसांत मिळतो जामीन ! – सिलिगुडी नारीशक्ती संघटनाया वेळी सिलिगुडी नारीशक्ती संघटनेच्या एका वरिष्ठ महिला सदस्याने सांगितले की, पोलीस आणि न्यायालय यांच्या दुर्लक्षामुळे ‘पॉक्सो’ कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या बलात्कार्यांना २-३ दिवसांत जामीन मिळतो. या क्षेत्रातील अनेक मुसलमान लोक नेपाळी हिंदु मुलींना लक्ष्य करत आहेत. जर पोलिसांनी अशा घटनांना वेळीच पायबंद घातला नाही, तर आमची संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करील. |
संपादकीय भूमिका
|