उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘धर्मरक्षक संस्थे’च्या वतीने ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रम साजरा

‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रम

भोपाळ (मध्यप्रदेश) – आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी होतो अन् युवा पीढी सनातन धर्मापासून दूर जाते. ही स्थिति पालटण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे  मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक  श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून उभ्या केल्या जाणार्‍या राष्ट्र्रविरोधी अर्थव्यवस्थेला विरोध करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

डावीकडून श्री. संगीत वर्मा, श्री. रघुनंदन शर्मा, श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. निर्मल निमाडिया

धर्म रक्षक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही मध्यप्रदेशमधील बैरागढस्थित श्री काली मंदिर परिसरात आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

बोलतांना श्री. आनंद जाखोटिया

साध्वी सरस्वतीदीदी आणि प्रा. कुसुमलता केडिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या एक दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री. रामेश्‍वर मिश्रा, श्री. रघुनंदन शर्मा, संगीत वर्मा, श्री. अभय पंडित यांनीही विचार मांडले. ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी मध्यप्रदेशातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी विचारमंथन कार्यक्रमात भाग घेतला, तसेच सर्वांनी भारताला हिंदु बनवण्याची शपथ घेतली’, अशी माहिती ‘धर्मरक्षक संस्थे’चे संस्थापक विनोद यादव यांनी दिली.