आता ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र या ग्रहांवरही यान उतरवणार ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

बेंगळुरू –  येत्या काही वर्षात ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र ग्रहांवरही यान उतरवणार आहे, अशीमाहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’चे) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.

श्री. सोमनाथ पुढे म्हणाले की, भारताने केवळ दोन मोहिमांमध्ये हे यश मिळवले आहे. चंद्रयान-३ हे जागतिक दर्जाच्या उपकरणांसह संपूर्ण स्वदेशी मोहीम आहे. चंद्रयान-३ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ‘सेन्सर’ आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे उपकरणे आहेत.