हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३५१ लोकांचा मृत्यू !
शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. राज्यात पावसामुळे आतापर्यंत ३५१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३३६ जण घायाळ झाले आहेत, तसेच ३८ जण बेपत्ता आहेत.
प्रकृति का प्रहार, हिमाचल में हाहाकार
Watch live TV: https://t.co/Gb1YKZOk1a #HimachalFloods #himachalpradeshlandslide #IndiaOnMoon@avasthiaditi @Vivekshandilyaa pic.twitter.com/ZRmIXasozo
— India Daily Live (@IndiaDLive) August 24, 2023
राज्यातील ३ राष्ट्रीय महामार्गांसह ५३८ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. २ सहस्र ८९७ गावांमध्ये वीज नाही. अनेक ठिकाणी वीजेची रोहित्रे ‘ट्रान्सफॉर्मर) कोसळल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे २१४ प्रकल्प बंद पडलले आहेत. लोकांना वीज, पाणी आदी मूलभूत गोष्टी मिळणेही कठीण झाले आहे.