भिवंडी येथे दुचाकी चोरणारी धर्मांधांची टोळी अटकेत !
१६ दुचाकी जप्त, आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी
ठाणे, २३ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी येथे दुचाकी चोरणार्या धर्मांधांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रुपये किंमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्याची माहिती भिवंडी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुस्तकीम उपाख्य आसीफ महंमद अमीन अन्सारी (वय २५ वर्षे), जावेद उपाख्य जाहिद जाबीर शेख (वय ३९ वर्षे), हसनैन जाफर हुसेन सैयद (वय २१ वर्षे) आणि अतिक उपाख्य अल्ताफ मुनाफ शेख (वय २३ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.