ठाणे महानगरपालिकेचा लाचखोर लिपिक आणि खासगी व्यक्ती कह्यात !
ठाणे, २३ ऑगस्ट (वार्ता.) – मुलाचे नाव कर पावतीवर समाविष्ट करण्यासाठी लाचेची मागणी करत ८ सहस्र ५०० रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेच्या कौसा दिवा उपप्रभाग कार्यालयातील लिपिक गिरीश रतन अहिरे आणि खासगी इसम असीम इनायत शरीफ यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. २२ ऑगस्टला ही रक्कम अहिरे याच्या सांगण्यावरून शरीफ हा घेत असतांना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)