‘जी-२०’ देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सप्टेंबरमध्ये भारत दौर्यावर
वॉशिंग्टन (अमेरिका) – सध्या भारत ‘जी-२०’ देशांच्या संघटनेचे नेतृत्व करत आहे. यावर्षी ९ आणि १० सप्टेंबरला देहली येथे या संघटनेची शिखर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी काही देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित रहाणार आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही समावेश आहे. बायडेन ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत भारताच्या दौर्यावर जाणार असल्याची अधिकृत माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे. या दौर्यामध्ये जो बायडेन अन्य देशांच्या प्रमुखांशी युक्रेन-रशिया युद्ध आणि अन्य जागतिक आव्हाने या विषयांंवर चर्चा करणार आहेत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
7 से 10 सितंबर तक दिल्ली में रहेंगे अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडेन, G-20 शिखर सम्मेलन में लेंगे हिस्सा#G20Summit #JoeBidenhttps://t.co/0E5EoplEsi
— ABP News (@ABPNews) August 22, 2023
जी-२० मध्ये सहभागी होणारे आणि अतिथी देश
‘जी-२०’ गटामध्ये अर्जेंटिना, ब्राझिल, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, रशिया, फ्रांस, युनाइटेड किंगडम, जर्मनी, इटली, तुर्किये, दक्षिण अफ्रीका, सौदी अरेबिया, भारत, इंडोनेशिया, चीन, कोरिया गणराज्य, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांसह युरोपीयन युनियनचा समावेश आहे. यासह अतिथी देशांमध्ये नेदरलँड, स्पेन, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, ओमान, नायजेरिया, मॉरिशस, बांगलादेश आणि सिंगापूर यांचा समावेश आहे.