भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अल्पवयीन दलित मुलीवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार !
अबेद लाला याच्यासह ३ जणांना अटक !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे एका अनाथ अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. २१ ऑगस्टच्या सकाळी अमली पदार्थ सेवन केलेले ८ लोक मुलीच्या घरात घुसले आणि लहान भावासमोरच त्यांनी तिच्या मानेवर चाकू ठेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बलात्कार्यांनी तिला इमारतीच्या तिसर्या मजल्यावर नेले. तोपर्यंत घरात उपस्थित झालेल्या ४ लहान मुलांना घराबाहेर जाण्यापासून काही बलात्कार्यांनी रोखले. पीडितेच्या भावाने याला विरोध केल्यावर त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. पीडितेने तिसर्या मजल्यावर आरडाओरड केल्याने बलात्कारी पळून गेले. पीडितेने जवळच रहाणार्या तिच्या मोठ्या बहिणीला यासंदर्भात सांगितल्यावर पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पीडिता आणि तिच्या लहान भावाचे म्हणणे आहे की, बलात्कारी हे त्यांच्या परिसरात रहाणारेच आहेत. त्यांपैकी ‘टायसन’ नावाची व्यक्ती ही त्यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर रहाणारी आहे. स्थानिक गुंड अबेद लाला याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
भाई के सामने अनाथ बच्ची का गैंगरेप: तेलंगाना में 8 दरिंदों ने घर में घुस कर दिया वारदात को अंजाम, गर्दन पर चाकू रख कर किया सामूहिक बलात्कार#Hyderabad #Gangrape #Telanganahttps://t.co/3jVEea6w3I
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 22, 2023
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी ! ‘भीम मीम भाई भाई’ची आरोळी ठोकणारे आता अबेद लाला आणि त्याच्या साथीदारांना शरियतनुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी करतील का ? |