युक्रेनकडून मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमणाचा प्रयत्न ! – रशिया
मॉस्को (रशिया) – २३ ऑगस्टला पहाटे युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न रशियाने हाणून पाडला. युक्रेनचे तिन्ही ड्रोन नष्ट करण्यात आले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
#FourKaFire: यूक्रेन ने मॉस्को पर किया ड्रोन अटैक.. रूसी डिफेंस सिस्टम ने यूक्रेनी ड्रोन को मार गिराया, ड्रोन अटैक के बाद #Moscow में अलर्ट#Ukraine️ को F-16 देगा डेनमार्क.. जेलेंस्की ने समझाैते को ऐतिहासिक बताया@NAINAYADAV_06 @iamdeepikayadav @anchor_barkha #Zelensky pic.twitter.com/jHy5NW6ZN5
— Times Now Navbharat (@TNNavbharat) August 21, 2023
२१ ऑगस्टला युक्रेनच्या ड्रोनने रशियाच्या बेलगोरोड भागात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी २० ऑगस्ट या दिवशी मॉस्कोवर सातत्याने झालेल्या ड्रोन आक्रमणामुळे रशिया हादरला होता. युक्रेनचे हे आतंकवादी आक्रमण असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.