‘नासा’ चंद्रावर पुन्हा मानव पाठवणार !
वॉशिंग्टन – अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. नासाने या मोहिमेसाठी धोरण सिद्ध करण्यासाठी तिने भूगर्भशास्त्र पथकाची निवड केली आहे. नासाने वर्ष १९६९ मध्ये म्हणजे ५४ वर्षांपूर्वी चंद्रावर अंतराळवीर पाठवले होते. त्यावेळी नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे साथीदार गेले होते.
NASA: चांद पर 50 साल बाद फिर नासा भेजेगा इंसान, बना रहा यह खास टीम; जानें कौन बनेगा इसका हिस्सा#NASA #MoonMission #MannedMoonMission #LunarLanding #ApolloMissionhttps://t.co/esUZk3bS8a
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 23, 2023
शास्त्रज्ञांना चंद्रावर लोकांची वसाहत निर्माण करण्यासाठी संशोधन करायचे आहे. त्यामुळे ‘नासा’ची ‘आर्टेमिस ३’ मोहीम चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे. चंद्रावर पाठवल्या जाणार्या पथकामध्ये महिलांचाही समावेश केला जाईल आणि हे पथक चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ पाठवले जाईल, असा निर्णय ‘नासा’ने घेतला आहे.