बंगालच्या जादवपूर विश्वविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुसर्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू
|
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील जादवपूर विश्वविद्यालयात स्वप्नदीप कुंडू या १८ वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा वसतीगृहाच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याचे रॅगिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी त्याला वसतीगृहाच्या ७० क्रमांकाच्या खोलीत कपडे काढण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर दुसर्या मजल्यावरच्या मार्गिकेमध्ये नग्न फिरायला लावण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी १२ तरुणांना अटक केली आहे. यात विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे, जे अवैधरित्या वसतीगृहात रहात होते. स्वप्नदीपने काही दिवसांपूर्वी विश्वविद्यालयाच्या बंगाली भाषा विभागात प्रवेश घेतला होता.
गे नहीं हो तो मर्दानगी दिखाओ ! सीनियर ने नंगा कर बालकनी में घुमाया, JU में रैगिंग से परेशान होकर बालकनी से कूदा था छात्र। पढ़िए पूरी खबर। https://t.co/y1b01YUkD7 pic.twitter.com/SOc7zfm9pu
— NBT Hindi News (@NavbharatTimes) August 23, 2023
राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, जाधवपूर विश्वविद्यालयातील घटनेने आमचे डोळे उघडले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसाठी ‘अँटी रॅगिंग हेल्पलाइन’ क्रमांक जारी करत आहोत. अशी कोणतीही घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना १८००३४५५६७८ वर संपर्क करा. संपर्क करणार्याची ओळख उघड केली जाणार नाही. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे अन्वेषण आता सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.
रॅगिंग म्हणजे काय ?(सौजन्य : Anirudh Sharma) कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोचत असेल किंवा पोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे म्हणजे ‘रॅगिंग’, अशी व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे. |
विधानसभेत भाजपकडून टीका
विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण बंगाल विधानसभेत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी उपस्थित केले. ते म्हणाले की, विश्वविद्यालय देशद्रोही घटकांचे अड्डे बनले आहे. येथे उघडपणे अमली पदार्थ आणि मद्य यांचे सेवन केले जाते. राज्य सरकार केवळ मूकदर्शक राहिले आहे.
संपादकीय भूमिकाविश्वविद्यालयात विद्यार्थी शिकण्यास येतो. तेथे त्याच्यावर नैतिकतेच्या शिक्षणाने योग्य संस्कार करून तो आदर्श नागरिक बनेल, हे पहाणे आवश्यक असते; मात्र अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे. यातून विश्वविद्यालयांची स्थिती उघड होते ! |