अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी !
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
अमरावती – येथील खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या वेळी राणा यांच्या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधून ‘चाकूने वार करून ठार करू’, अशा आशयाची ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
Navneet Rana Threaten Call: नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणhttps://t.co/1HCOg38StR#navneetrana #Threat #lokshahimarathi
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) August 22, 2023
१६ ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती नवनीत राणा यांच्या भ्रमणभाषवर संपर्क साधून ‘गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करीन, ते कळणारही नाही’, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून त्याने अश्लील शिवीगाळही केली आहे’, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. गेल्या वर्षीही ‘हनुमान चालिसा पठण केल्यास तुम्हाला ठार मारू’, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी नवी देहली येथील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.