वैदिक विज्ञान आणि मंत्रशास्त्राचे अभ्यासक डॉ. फडके यांचा मंत्रशास्त्रातील संशोधनाविषयी सन्मान !
पुणे येथील ४१ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन !
पुणे – वैदिक विज्ञान आणि मंत्रशास्त्राचे अभ्यासक डॉ. मोहन फडके यांचा नुकत्याच पार पडलेल्या ४१ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात आला. मंत्रशास्त्रातील संशोधनाविषयी हा सन्मान झाला. भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, पुणे आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकादमी, सातारा यांच्या वतीने येथील सदाशिव पेठ येथे आयोजित या अधिवेशनात राज्यातील ३० हून अधिक ज्योतिष संस्थांचे प्रतिनिधी आणि देशातील अनुमाने १ सहस्रहून अधिक ज्योतिर्विद सहभागी झाले होते. अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध टॅरो ग्रंथलेखिका अधिवक्त्या सुनीता पागे यांनी आणि स्वागताध्यक्षपद वास्तूज्योतिषी अधिवक्त्या वैशाली अत्रे यांनी भूषविले. या प्रसंगी चंद्रकांत शेवाळे, डॉ. मधुसूदन घाणेकर, कैलास केंजळे आदी उपस्थित होते.
भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा #ज्योतिष_अकादमी_सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने,पुण्यात 20-21ऑगस्ट रोजी 41 वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तसेच या दोन संस्थांसह महाराष्ट्रातील 27 ज्योतिष संस्थांचाही सहभाग आहे. pic.twitter.com/pDT8gfJqQb
— AIR News Pune (@airnews_pune) August 19, 2023
या वेळी डॉ. फडके म्हणाले की, ज्योतिष हे शास्त्र असून त्यातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. अथर्व वेदातील कर्मजभाव व्याधी दैवी चिकित्सा आणि ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्यायोगे मोठे व्याधी निवारण करता येते. जगाच्या पाठीवरील असाध्य रोगही विनाऔषध बरे करता येतात आणि होतात, हे प्रयोगानिशी सिद्ध केले आहे. या उपचारपद्धतीचा सखोल अभ्यास होणे आणि त्याचा सातत्यपूर्ण प्रसार करणे आवश्यक आहे.