पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !
पुणे – येथील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यात यावे, यासाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तासभर ठिय्या आंदोलन केले. (यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कारवाई का करत नाही ?- संपादक)
स्टॉप ऑर्डर असतानाही पुण्येश्वराच्या परिसरात अनधिकृत कामे सुरू आहेत. या ठिकाणी अनधिकृतपणे पत्रे लावले जात आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व हिंदूत्त्ववादी संघटनांनी सोमवारी पुणे महापालिका भवनासमोर आंदोलन केले. हिंदूत्त्ववादी संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन… pic.twitter.com/TRCJ2zsioD
— Dheeraj Ghate (@DheerajGhate) August 21, 2023
या वेळी बोलतांना भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, मशिदीचे अतिक्रमण हटवण्यासाठी आजपर्यंत प्रशासनाच्या समवेत अनेक वेळा पत्रव्यवहार केला; मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणीसुद्धा त्यांनी दिली. या वेळी ‘समस्त हिंदु आघाडी’चे मिलिंद एकबोटे, ‘पतित पावन संघटने’चे अध्यक्ष स्वप्नील नाईक यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.