पुणे येथील आतंकवाद्यांचे धागेदोरे पुष्कळ लांबपर्यंत ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
पुणे – येथे आतंकवाद्यांची मोठी साखळी सापडली आहे. तिचे धागेदोरे पुष्कळ लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी उघडपणे सांगू शकत नाही; परंतु पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस आणत आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते आकुर्डी येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. हे अमली पदार्थ तरुण मुला-मुलींना अक्षरश: संपवून टाकत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांना केल्या आहेत.’’ (अशा सूचना पोलिसांना का कराव्या लागतात ? हे सर्व पोलिसांना दिसत नाही का ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात ! – संपादक)
संपादकीय भूमिका :असे असेल तर यावर लवकरात लवकर उपाययोजना निघायला हवी ! |