भोपाळमधून ५ मुसलमानांना अटक
भूपेंद्र विश्वकर्मा यांनी पत्नी आणि दोन मुले यांच्या आत्महत्या केल्याचे प्रकरण
भोपाळ (मध्यप्रदेश) – ऑनलाईन कर्ज आणि ऑनलाईन नोकरी यांच्या जाळ्यात अडकल्याने भूपेंद्र विश्वकर्मा यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी आणि दोन मुले यांच्यासह येथे आत्महत्या केली होती. या प्रकरणी आणखी ५ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शारिक बेग, महंमद उबेज खान, अरशद बेग, शाहजहान उपाख्य शाजी खान आणि फरहान रहमान यांचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी खलील नावाच्या मुसलमानाला राजस्थानमधील टोंक येथून अटक केली होती.
भोपाल के फैमिली सुसाइड केस में पाँच और गिरफ्तार
1. शारिक बेग
2. मोहम्मद उबेज खान
3. अरशद बेग
4. शाहजहाँ उर्फ शाजी खान
5. फरहान रहमानभूपेंद्र विश्वकर्मा ने 3 और 9 साल के बेटे को जहर देने के बाद पत्नी के साथ लगा ली थी फाँसी।https://t.co/XDsVXcIPwC
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 22, 2023
भूपेंद्र विश्वकर्मा यांनी बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून भोपाळमधील येस बँकेच्या ‘अमायरा ट्रेडर्स’च्या खात्यात ९५ सहस्र ७०० रुपये पाठवले होते. ‘अमायरा ट्रेडर्स’चे मालक शारिक बेग हा आहे. शारिकच्या चौकशीत अन्य आरोपींची नावे समोर आली. या फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान ! |