भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद ‘फिडे विश्‍वचषक बुद्धीबळ स्पर्धे’च्या अंतिम फेरीत !

अंतिम फेरीत मग्नस कार्लसन याच्याशी होणार लढत !

भारतीय ग्रँडमास्टर आर्. प्रज्ञानंद

बाकू (अझरबैजान) – येथे चालू असलेल्या ‘फिडे विश्‍वचषक बुद्धीबळ स्पर्धे’च्या अंतिम फेरीत १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर्. प्रज्ञानंद याने प्रवेश केला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआना याचा पराभव केला. अंतिम फेरीत प्रज्ञानंद याचा सामना जागतिक क्रमवारीत प्रथम कमांकावर असणारा खेळाडू मॅग्नस कार्लसन याच्याशी होणार आहे.

या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यापैकी कार्लसनने ७ आणि प्रज्ञानंदाने ५ जिंकले आहेत. ६ सामने अनिर्णित राहिले. अंतिम फेरीत पोचणारा प्रज्ञानंदा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ग्रँडमास्टर विश्‍वनाथन् आनंद हे अंतिम फेरीत पोचले होते. प्रज्ञानंदा हा भारतातील तमिळनाडू राज्यातील आहे.

मला अंतिम फेरी पोचण्याची अपेक्षा नव्हती ! – प्रज्ञानंदा

अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञानंद म्हणाला, ‘मला अंतिम फेरीमध्ये पोचण्याची अपेक्षा नव्हती. मी केवळ माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीन आणि पुढे काय होते ते पाहीन.’