(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ?’- अविनाश पाटील, अंनिस
घोटाळेबाज अंनिसचा (अविनाश पाटील गट) बिनबुडाचा आरोप !
पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केली ?, हे सर्वांना ठाऊक आहे. (अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना अविनाश पाटील कशाच्या आधारे असे विधान करत आहेत ? कि त्यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते ? – संपादक) तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ? (‘आम्ही सांगतो तेच गुन्हेगार’, असे म्हणणे ही अंनिसची जुनी खोड असून त्यापोटी हिंदु संतांना येनकेन प्रकारेण अपकीर्त करायचे, हा अंनिसचा ‘अविवेकी’पणा आहे ! – संपादक)
सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –
ते २० ऑगस्ट या दिवशी पुण्यातील एस्.एम्. जोशी सभागृह येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘विवेक निर्धार मेळाव्या’त बोलत होते. या वेळी डॉ. राम पुनियानी, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, अंनिसचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माधव बागवे आदी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे.