ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांच्या मानधनात केली ५०० रुपयांची वाढ !
इमामांंना आता मिळणार ३ सहस्र रुपये, तर पुरोहितांना दीड सहस्र रुपये !
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
(मुअज्जिन म्हणजे मशिदीमध्ये नमाजासाठी लोकांना अजान देऊन बोलावणारा)
कोलकाता (बंगाल)- बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नोंदणीकृत इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांना देण्यात येणार्या मासिक भत्त्यांमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. आता इमामांना प्रत्येकी ३ सहस्र रुपये, तर पुरोहितांना प्रत्येकी १ सहस्र ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. तसेच मुअज्जिन यांना आता २ सहस्र ५०० रुपये मिळणार आहेत. बंगालमध्ये ३० सहस्र इमाम आणि २० सहस्र मुअज्जिन आहेत. वक्फ बोर्डच्या माध्यमांतून सरकार त्यांना भत्ता देत असते.
2024 से पहले वोट बैंक साधने में जुटीं ममता? बढ़ाया इमामों और पंडितों का भत्ता#WestBengal #MamataBanerjee https://t.co/YsB06HYqWo
— Hindustan (@Live_Hindustan) August 22, 2023
संपादकीय भूमिका
|