योगी आणि संन्यासी माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी पाया पडून आशीर्वाद घेणे माझी सवय !
योगी आदित्यनाथ यांना पाया पडण्यावर अभिनेते रजनीकांत यांनी दिले स्पष्टीकरण !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – चित्रपट अभिनेते रजनीकांत उत्तरप्रदेशच्या दौर्यावर असतांना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या वेळी रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. ‘योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा रजनीकांत वयाने बरेच मोठे असतांना त्यांनी पाया पडायला नको होते’, अशी टीका सामाजिक माध्यमांतून रजनीकांत यांच्यावर करण्यात आली. पाया पडण्याविषयी पत्रकारांनी रजनीकांत यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले, ‘योगी असो किंवा संन्याशी, जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे, ही माझी सवय आहे. तेच मी केले आहे’, असे उत्तर त्यांनी दिले.
सुपरस्टार रजनीकांत ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के पैर छुए थे, जिस पर उन्हें खूब ट्रोल किया गया है। अब इस पर रजनीकांत ने रिएक्ट किया है। #Rajnikanth #YogiAdityanath https://t.co/KwEdSSFIev
— India TV (@indiatvnews) August 22, 2023
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे ! |