बगाहा (बिहार) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक !
बगाहा (बिहार) – येथील रतनमाला क्षेत्रात २१ आगस्ट या नागपंचमीच्या दिवशी हिंदूंच्या मिरवणुकीला मशिदीजवळ मुसलमानांनी विरोध केल्यामुळे २ गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यानंतर बगाहा आणि मोतिहारी भागात हिंसाचार झाला. या हिंसाचारात २ पोलीस आणि १ पत्रकार यांसह १२ जण घायाळ झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिनेश राय घटनास्थळी पोचले. रतनमाला परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (मुसलमानच सर्वप्रथम हिंसाचार घडवतात आणि उलट भारतात मुसलमानांचे अस्तित्व धोक्यात असल्याचा टाहो फोडतात ! – संपादक)
हिंसा की आग में फिर झुलसा बिहार…बगहा में महावीरी जुलूस के दौरान जिहादियों ने की तोड़फोड़ और आगजनी@NitishKumar @yadavtejashwi @BJP4Biharhttps://t.co/9uDyAxCwTb
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) August 22, 2023
१. ४०० हून अधिक भाविकांचा समावेश असणारी मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर २०० हून अधिक मुसलमानांनी तिला विरोध केला. ‘येथून मिरवणूक नेता येणार नाही’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक संतप्त झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि तोडफोड चालू झाली. काही घरांची तोडफोड करण्यात आली. तसेच दुचाकींची जाळपोळ करण्यात आली.
२. या हाणामारीत अमित कुमार, आयुष कुमार, पहावरी प्रसाद, राधेश्याम मांझी, गोलू कुमार, भगवान चौधरी, पत्रकार मुन्ना राज, पोलीस शिपाई हरीश राम आणि नगीना यादव हे घायाळ झाले आहेत.
३. रतनमाला येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस उपअधीक्षक अशोक चौधरी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही ! |