सिंधुदुर्ग : देहलीतील अल्पवयीन मुलगी वेंगुर्ल्यात सापडल्याच्या प्रकरणात आणखी एका मुसलमानाचा सहभाग

अश्रफ मुजावर याला देहली पोलीस ठाण्यात उपस्थित रहाण्याची नोटीस

वेंगुर्ला – देहली येथून गायब झालेल्या आणि शहरातील पिराचा दर्गा येथे मुसलमानाकडे सापडलेल्या पीडित मुलीने देहली न्यायालयात दिलेल्या जबाबात या गुन्ह्यात अश्रफ मुजावर (रहाणार वेंगुर्ला) याचेही नाव घेतले. त्यामुळे देहली येथील  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांनी २१ ऑगस्ट या दिवशी वेंगुर्ला येथे येऊन अश्रफ मुजावर याला कह्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली, तसेच त्याला जहांगीरपुरी (देहली) पोलीस ठाण्यात उपस्थित रहाण्याविषयी नोटीस दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत २ मुसलमान सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देहली येथील अल्पवयीन मुलगी तिच्या घरात कोणासही न सांगता तिच्या ‘इन्स्टाग्राम’ वरील वेंगुर्ला येथील मित्र जावेद मकानदार (रहाणार पिराचा दर्गा, वेंगुर्ला) याच्याकडे आली होती. या प्रकरणी उत्तर-पश्चिम देहली येथील जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार देहली पोलिसांनी वेंगुर्ले येथे येऊन त्या मुलीसह संशयित मकानदार याला चौकशीसाठी कह्यात घेतले होते.


सविस्तर वृत्त वाचा –

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे मुसलमानाकडे सापडली
https://sanatanprabhat.org/marathi/697699.html