पुणे येथील ५ व्या मानाच्या ‘केसरी वाडा’ गणपति बाप्पाचे आगमन !
पुणे – मानाच्या ५ व्या ‘केसरी वाडा’ येथील गणपतिबाप्पाचे आगमन ‘टिळक पंचांगा’नुसार होते. २० ऑगस्ट या दिवशी गणपति बाप्पाचे ‘केसरी वाड्या’त ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. ‘२० ऑगस्टपासून पुढील मासापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती ‘केसरी वाडा’ गणेशोत्सवाचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी दिली.