पुणे शहरातील ५० गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’अंतर्गत २९७ जणांना अटक !
पुणे – नागरिकांमध्ये दहशत पसरवणार्या टोळ्यांवर जरब ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर ‘मकोका’चा (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यास प्रारंभ केला आहे. जानेवारीपासून आजपर्यंत शहरातील ५० गुंड टोळ्यांतील २९७ गुन्हेगारांवर ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.
शहरामध्ये विविध भागांमध्ये या टोळ्यांकडून हातात कोयते, तलवारी घेऊन दहशत माजवणे, सोसायट्यांमधील, रस्त्यावरील वाहनांना आगी लावणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, असे प्रकार घडत होते. त्या-त्या गुन्हेगारांचे गुन्ह्यांची पडताळणी करून ‘मकोका’ लावण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :गुन्हेगारांवर कायमची जरब बसवण्यासाठी कायद्याची कठोरपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यातूनच गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी धाक निर्माण होईल ! |