हिंदु जनजागृती समितीकडून प्रखर राष्ट्रवादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांची भेट !
जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे प्रखर राष्ट्रवादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे येथील मशाल यात्रेसाठी आगमन झाले होते. त्या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी श्री. जाखोटिया यांनी त्यांना समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच त्यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हलाल जिहाद’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आले. या प्रसंगी हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जैसवानी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.